Home » काव्यसंग्रह »
प्रेम
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे आयुष्याच वळण...म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाहीत्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तरकदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते कधी कळालचं नाही...म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.हल्ली प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे..नंतर विचार आला अजुन लग्नाला 5 वर्षे आहेतं खुप वेळ आहे!पण काय करु आता कुणी भेटतच नाही

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
0 comments for this post
Leave a reply