वळुन पाहिले प्रत्येक वळणावरकधी तरी तुझी साद येईल...ना वाटले कधी प्रेम तुझेइतक्या लवकर कच खाईल...ना केली मी पर्वा स्व:ताची ,ना मला तमा या जगाची...तुझ्या सहवासात आयुष्य जावंहीच एक इच्छा मज वेडीची...तु मात्र कधी जाणली नाहीसकिंम्मत त्या प्रेमाची...मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीसस्वप्न आपल्या प्रीतीची..सांभाळु ना शकलास तुनात्यांचा हा डोलारा...ना उरले हाती माझ्या काही,विस्कटत गेला डाव सारा...अजुनही वेड्यागत मीतुझ्यावर प्रेम करते...सहवासातले क्षण सोबतीलाआयुष्याची नाव हाकते..जाणते आता कधीच न येणारतुझी ती प्रेमळ साद...पण शेवटच्या श्वासापर्यंत असेलतुझ्या आठवणींशी संवाद...
0 comments for this post
Leave a reply