वनक्षेत्र :
वनक्षेत्र :
वने - महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र सुमारे ६१, ९३९ चौ. कि. मी. आहे. भू-क्षेत्राच्या सुमारे २१% क्षेत्र वनाखाली आहे. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी कोणत्याही प्रदेशात क्षेत्रफळाच्या ३३% जमीन वनांखाली असणे गरजेचे आहे. प्रशासकीय विभागांनुसार सर्वात जास्त वनक्षेत्र नागपूर विभागात (२७,५५९ चौ. कि. मी.) आहे. तर सर्वात कमी वनक्षेत्र औरंगाबाद विभागात (२९१३ चौ. कि. मी.) आहे.
नाशिक विभाग - ११८२१ चौ. कि. मी. वनक्षेत्र.
अमरावती विभाग ९७२२ चौ. कि. मी. वनक्षेत्र.
पुणे विभाग - ६२३७ चौ. कि. मी. वनक्षेत्र.
जिल्ह्यांचा विचार करता राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात (सुमारे १३००० चौ. कि. मी.) आहे.
वनोत्पादने - इमारती लाकूड, जळाऊ लाकूड, बांबू, लाख, विड्याची पाने, अर्क व तेले, डिंक व राळ, कंदमुळे, फळे, तंतू, औषधी वनस्पती, प्राणिज पदार्थ इत्यादी वनोत्पादने राज्यात प्रामुख्याने सापडतात.
वनोद्योग - लाकूड कटाई, लगदा व कागद उद्योग, फर्निचर-प्लायवूड, विडी उद्योग, काडेपेट्या, फळ प्रक्रिया उद्योग, औषधी वनस्पती, अर्क- तेल उद्योग असे अनेक प्रकारचे वनांवर अवलंबून असलेले उद्योग राज्यात केले जातात.`पर्यटन' हा वनांशी जोडलेला आणखी एक महत्त्वाचा उद्योग होय.
राज्यातील राष्ट्रीय उद्याने :
१. ताडोबा राष्ट्रीय उद्यान - चंद्रपूर
२. नवेगाव राष्ट्रीय उद्यान - गोंदिया
३. बोरिवली राष्ट्रीय उद्यान (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) मुंबई उपनगर, ठाणे.
याशिवाय नागपूर जिल्ह्यात पेंच आणि अमरावती जिल्ह्यात गुगामल (मेळघाट) ही राष्ट्रीय उद्याने राज्यात आहेत.
प्रमुख अभयारण्ये :
राधानगरी- दाजीपूर अभयारण्य - कोल्हापूर. (गव्यांसाठी प्रसिद्ध)
चांदोली अभयारण्य - सांगली.
सागरेश्र्वर अभयारण्य - सांगली.
कोयना अभयारण्य - सातारा
माळणी पक्षी अभयारण्य (इंदिरा गांधी पक्षी अभरायरण्य) - सातारा.
भीमाशंकर - पुणे, ठाणे.
तानसा अभयारण्य - ठाणे
कर्नाळा पक्षी अभयारण्य - (महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य) - रायगड
नांदूर मध्मेश्र्वर अभयारण्य - नाशिक (हे अभयारण्य पाणपक्षांसाठी प्रसिद्ध आहे.)
देऊळगाव - रेहेकुरी अभयारण्य - अहमदनगर.
माळढोक पक्षी अभयारण्य - सोलापूर. (राज्यातील सर्वांत मोठे अभयारण्य)
गौताळा - औटरम घाट अभयारण्य - औरंगाबाद, जळगाव.
पाल-यावल अभायारण्य - जळगाव
किनवट अभयारण्य - नांदेड, यवतमाळ.
मेळघाट अभयारण्य - (राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प) - अमरावती.
बोर अभयारण्य - वर्धा.
नागझिरा अभयारण्य - गोंदिया
याशिवाय महाराष्ट्रात सागरी उद्याने आहेत.
आपल्या राज्यात सुमारे ८५ जातींचे सस्तन वन्य पशू, सुमारे ४६० जातींचे पक्षी, याशिवाय जमिनीवर सरपटणारे, पाण्यात राहणारे अनेक जातींचे प्राणी व कीटक वनांमध्ये आढळतात. वन्यजीवांमध्ये वाघ, बिबट्या, रानगवा, सांबर, चितळ, नीलगाय, अस्वल, माकड, तरस, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर हे पशू आढळतात. तर पक्ष्यांमध्ये बुलबुल, कोकिळा, सुतार, माळढोक, पोपट, हिरवे कबुतर, करकोचा, घुबड, मोर हे पक्षी तसेच स्थलांतर करणारी बदके, पाणकोंबडे, रोहित यांचा समावेश होतो.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply