हवामान व जमीन :
हवामान व जमीन :
हवामान -
महाराष्ट्र राज्य मोसमी वार्याच्या कक्षेत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात हवामानाची स्थिती सारखी नसते. कालावधीनुसार व विभागांनुसारही महाराष्ट्रात हवामानाची विविधता आढळते. कोकणात काहीसे उष्ण, सम व दमट तर सह्याद्री पर्वतावर आर्द्र व थंड हवामान असते. महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण, कोरडे व विषम हवामान आढळते.
अरबी समुद्रावररून येणारे मान्सुन वारे कोकणात व घाटमाथ्यावर जास्त पाऊस देतात. हे वारे सह्याद्री पर्वत ओलांडताना प्रतिरोध पर्जन्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडतो. मावळच्या पूर्व भागात मध्यम पाऊस पडतो. पर्जन्यछायेच्या प्रदेशाकडे (राज्याचा मध्य-पूर्व भाग) पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते. देशावर (पूर्वेकडील भाग) अवर्षणग्रस्त प्रदेशात अतिशय कमी पाऊस पडतो. विदर्भाच्या पूर्व भागात बंगालच्या उपसागरावरून वाहत येणार्या वार्यापासूनही काही प्रमाणात पाऊस पडतो. राज्याच्या अतिपूर्व भागात (गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे जिल्हे) काही भागांत अधिक पाऊस पडतो.
जमीन -
महाराष्ट्रात गोदावरी, भीमा, व कृष्णा तसेच तापी नदीच्या खोर्यात खोल थराची सुपीक, काळी माती पाहावयास मिळते. पठारावर इतरत्र मध्यम थराची काळी मृदा विस्तृतपणे पसरली आहे.
सह्याद्री पर्वत माथ्यावर, कोकणात रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांत, तर पठारावर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात जांभा प्रकारची लालसर मृदा आहे.
कोकणाच्या किनारपट्टीवर किनार्याची गाळाची मृदा सापडते. उत्तर कोकण, विदर्भाच्या पूर्व भागात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत तांबडी व पिवळसर मृदा आढळते.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud

0 comments for this post
Leave a reply