Home » काव्यसंग्रह »
प्रेमाची वेल
एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,तिला पाहताच त्याला तीच वेड लागल वेलीला विचारू तरी कस?या प्रश्नाने त्याला पछाडल, पण,आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वत:ला सावरल,वेल मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर पसरू लागली ,ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली , वेल म्हणाली ,झाडा मला तुझा आधार हवा आहे ,तू मला आधार देशील का ??यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,ते पाहून झाडाची निराशा झाली ,हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले,वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला.....

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
0 comments for this post
Leave a reply