Home » काव्यसंग्रह »
जगण्यासाठी अजुन काय हवं?
आई, एक बाप,एक भाऊ, एक बहिण,असं एखादं घर हवं,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक मित्र, एक शत्रु,एक सुख, एक दु़:ख,असं साधं जीवनजगण्यासाठी अजुन काय हवं?एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक सुर्य, एक चंद्र,एक दिवस, एक रात्र,फक्त सगळं समजायला हवं,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक शक्ती, एक भक्ती,एक सुड, एक आसक्तीठायी असेल युक्ती तर,जगण्यासाठी अजुन काय हवं?थोडा पैसा, थोडी हाव,थोडा थाट, थोडाबडेजाव,सगळयांच्या तोडी आपलंच नाव,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक नोकरी, एक छोकरी,दोन मुलं अन खायला भाकरी,उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक समुद्र, एक नदी,एक शांत, एक अवखळजीवनात असली जर एक तळमळजगण्यासाठी अजुन काय हवं?एक इच्छा, एक आशा,एक मागणं, अक अभिलाषा,मनात भरलेली सदा नशा,जगण्यासाठी अजुन काय हवं?

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
0 comments for this post
Leave a reply