प्रेम आहे वणवा,पेटवू म्हणता पटत नाही,की विझता विझत नाही....वैराण वाळवन्टात,सुखाचा पाऊस पाडते प्रेम,मनास गारवा देते प्रेम...प्रेम एक अवजड दगड,उचलता तो येत नाही,उचलला तर पेलता येत नाही...प्रेमात फक्त द्यायचे असते,घेणे त्याला खपत नाही,व्यवहार इथे चालत नाही...प्रेमाच्या लपन्डावात,आता जरी हरलोय मी,तरी हारून जिंकलोय मी....
0 comments for this post
Leave a reply