Home » काव्यसंग्रह »
एकदा तरी प्रेम करून बघ...
सगळ काही पाहिल असशीलच मगएकदा प्रेम करून बघ..एकटच काय जगायच..?आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..खुप वेळ असेल तुझ्याकडे..आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..कविता नुसत्याच नाही सुचणार...त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..खुप छान वाटत रे..सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ...नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..नुसतच काय जगायच..जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..एक जखम स्वतः करून बघ..स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..नुसत सुखच काय अनुभवायचे..दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..थोड्या जखमा स्वतः करून बघ..रिकाम काय चालायच..?आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..रडत असलेले डोळे लपवत..एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..सोपं नसत रे...एकदा रडून बघ..तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..सांगण्याचा हेतु एवढाच की..एकदा का होइना प्रेम करून बघ..

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
0 comments for this post
Leave a reply