प्राकृतिक रचना :
प्राकृतिक रचना :
महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्ट्या कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट व डोंगराळ प्रदेश, आणि महाराष्ट्र पठार असे ३ प्रमुख विभाग पडतात.
अरुंद, चिंचोळ्या कोकण किनारपट्टीचा हा भाग सखल व डोंगराळ आहे. कोकणाचा किनारा हा अनेक खाड्यांनी युक्त आहे. या प्राकृतिक विभागात ठाणे, मुंबई (शहर व उपनगर), रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे भाग येतात. उत्तरेपासून दक्षिणेकडे पाहत जाता दोतीवरा खाडी, वसई खाडी, धरमतर, राजपुरी, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग व कर्ली या खाड्या आहेत. सर्वांत दक्षिण टोकाला तेरेखोलची खाडी आहे.

किनारपट्टीस समांतर सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट आहे. पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी नद्यांचा जलविभाजक म्हणून हा पर्वत ओळखला जातो. गोदावरी, कृष्णा व भीमा या प्रमुख नद्यांसह त्यांच्या अनेक उपनद्यांचा सह्याद्री पर्वतामधे उगम झाला आहे. कळसूबाई, साल्हेर व सप्तश्रृंगीसारखी शिखरे सह्याद्रीच्या रांगेत आहेत. माथेरान, महाबळेश्र्वरसारखी घाटमाथ्यावरील ठिकाणे आहेत. सह्याद्रीपासून शंभू महादेव डोंगररांगा, हरिश्र्चंद्र - बालाघाट डोंगररांगा व सातमाळा - अजिंठा डोंगररांगा पठारावर पसरलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे. सह्याद्रीच्या रांगेत कोकण व दख्खनचे पठार या भागांना जोडणारे अनेक घाट आहेत. तसेच ऐतिहासिक महत्त्वाचे किल्लेही आहेत.
महाराष्ट्राचा पूर्वेकडील बराचसा भाग दख्खन पठाराने व्यापला आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पसरलेला पठारी प्रदेश म्हणजे हे दख्खनचे पठार होय. सुमारे ७ कोटी वर्षांपूर्वी भूगर्भात उद्रेक झाले व लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून हे पठार तयार झाले. राज्याचा सुमारे ९०% भाग या पठाराने व्यापलेला आहे. पठाराची पूर्व-पश्र्चिम लांबी ७५० कि. मी. असून, दक्षिणोत्तर रुंदी सुमारे ७०० कि. मी. आहे. पठारी भागातील डोंगररांगावर अहमदनगर पठार, सासवड पठार, औंध पठार, बुलढाणा पठार

राज्यातील प्रमुख शिखरांची सूची पुढीलप्रमाणे -
शिखरे | उंची |
कळसूबाई | १,६४६ मी. |
साल्हेर | १,५६७ मी. |
महाबळेश्र्वर | १,४३८ मी. |
हरिश्चंद्रगड | १,४२४ मी. |

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply