अण्णा हजारे 30 ला सिंधुदुर्ग दौऱ्यावर
सावंतवाडी- जनलोकपाल विधेयक आणि लोकायुक्तबाबत भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करीत जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे बुधवारी (ता. 30) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. श्री. हजारे यांची बुधवारी कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता जाहीर सभा होईल.
श्री. हजारे यांनी जनलोकपाल, लोकायुक्त आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या जनजागृतीसाठी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यात ठिकठिकाणी दौरा करीत श्री. हजारे आणि त्यांचे सहकारी जनलोकपाल, लोकायुक्तसंदर्भात आपली भूमिका जनतेसमोर ठेवणार आहेत. जनलोकपालबाबत नेमकी भूमिका लोकांना पोहोचावी, भ्रष्टाचाराला आळा बसावा, यासाठी प्रभावी कायदा आणि जनलोकपालची आवश्यकता लोकांसमोर मांडली जाणार आहे. जनलोकपाल विधेयकासाठी सातत्याने आंदोलने, उपोषणे, सत्याग्रह करूनही अद्याप शासनाने दाद दिलेली नाही. यासंदर्भात जनमत घडविण्यासाठी श्री. हजारे आणि त्यांचे सहकारी राज्यातील साठहून अधिक शहरांना भेटी देणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात त्यांची कणकवली येथे आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता सभा होईल. सिंधुदुर्गवासीयांनी यास उपस्थित राहावे, असे आवाहन भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासच्या सिंधुदुर्ग जिल्हा समितीचे अध्यक्ष जयानंद मठकर व कार्याध्यक्ष आनंद अंधारी यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासच्या सर्व तालुका समित्यांनी या आठवड्यात आपापल्या समित्यांच्या बैठका घेऊन श्री. हजारे यांच्या सभेसंदर्भात नियोजन करावे, असे आवाहन श्री. मठकर व श्री. अंधारी यांनी केले आहे.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply