सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आंब्याला बदनाम करण्याचा प्रयत्न
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कर्नाटक राज्यातील विविध बाजारपेठांमधून हापूस आंब्यासारखा दिसणारा आंबा स्वस्त दराने खरेदी करून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात तो दलालांमार्फत कॅनिंग कंपन्यांना दिला जात आहे. त्यामुळे येथील आंब्याला योग्य भाव मिळत नाही. अन्य राज्यातील आंबा मिसळून सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील हापूस आंब्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. याला आळा घालण्यासाठी अशी कोणीही व्यक्ती आढळल्यास बाजार समितीकडे त्वरित संपर्क साधावा. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी साटम यांनी दिला.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील आंब्याची प्रत ही उत्तम तऱ्हेची आहे. त्यात बाहेरील राज्यातील आंबा मिसळून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. कर्नाटक राज्यातील बेळगाव किंवा इतर बाजारपेठांमधून हापूस आंब्यासारखा दिसणारा आंबा स्वस्त दराने खरेदी करून तो दलालांमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅनिंग कंपन्यांना दिला जात आहे. याचा परिणाम येथील आंब्याचा दर कमी मिळत आहे. बाजारपेठेत आंब्याची बदनामी होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असे कोणीही आढळल्यास बाजार समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती साटम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply