Featured Posts
Recent Articles

पावसाळ्याचे आव्हान कोकण रेल्वे पेलणार?

मुंबई - पावसाळ्यात दरड कोसळून कोकण रेल्वे ठप्प होणे हा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदा मात्र मुसळधार पावसाचे आव्हान पेलण्याची कोकण रेल्वेने जोरदार तयारी केली आहे. लोहमार्गालगतच्या 74 दरडी हटविण्यात आल्या असून धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेबाबत 24 तास पाहणी केली जाणार आहे.

कोकणात मुसळधार पावसाचा मारा सुरू झाल्यावर दरडी आणि चिखलाचा राडारोडा लोहमार्गावर येऊन पडतो; त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होते. दरवर्षीचा हा अनुभव पाठीशी असल्याने या वर्षी दरडी आणि कापलेल्या डोंगरमाथ्यांना मजबूत बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरडी असलेला भाग समतल करण्यात आला असून तसेच कापलेल्या दरडींभोवती पोलादी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावरील बोगद्यांत "नेट बोल्टिंग' करण्यात आले
आहे. सुरक्षिततेसाठी 1999 ते 2012 पर्यंत 267 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

निवसर स्थानकाजवळ पर्यायी मार्ग काढण्यात आल्यामुळे तेथे जमीन खचून रेल्वे सेवा ठप्प होण्याच्या समस्येतून सुटका झाली आहे. गतवर्षी पोमेंडी येथे दरड कोसळून रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तेथील डोंगरमाथ्यावर कॉंक्रिटीकरण आणि अन्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्यात आल्याचा दावा कोकण रेल्वेने केला आहे. दरड कोसळल्यास ती तत्काळ बाजूला करता यावी यासाठी रत्नागिरी येथे "बीएफआर' यंत्र सज्ज ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात रेल्वे मार्गालगतच्या धरणांतून अचानक पाणी सोडले जाऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय ठेवण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाने दिली.

Share and Enjoy:

0 comments for this post

Leave a reply

We will keep You Updated...
Sign up to receive breaking news
as well as receive other site updates!
Subscribe via RSS Feed subscribe to feeds
Sponsors
Template By SpicyTrickS.comSpicytricks.comspicytricks.com
Template By SpicyTrickS.comspicytricks.comSpicytricks.com
Popular Posts
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud