Home » sindhu news »
अरेss देवा, मुंबई-नवी मुंबईतही स्त्री-भ्रूणहत्या!
* मुंबईला बीडची बाधा
* मुंबई-नवी मुंबईत दोन स्त्रीभ्रूण-एक अर्भक सापडले
* दोन भ्रूणांचे अद्याप लिंगनिदान नाही
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
बीडमधील स्त्रीभ्रूणहत्येच्या घृणास्पद प्रकारांनी महाराष्ट्र हादरला असतानाच , मुंबई व नवी मुंबईतही असाच पाशवी प्रकार सुरू असल्याचे शुक्रवारी समोर आले. कुर्ला , खारदांडा व नेरूळमधील कचराकुंड्यांत तीन भ्रूण व एक अर्भक सापडले. यापैकी एक भ्रूण व अर्भक स्त्रीचे असून दोन भ्रूणांचे लिंग समजू शकलेले नाही. या सर्व प्रकरणातील पालकांचा शोध पोलिसांनी सुरू केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्ला हलावपूल येथील हिंदी माध्यमाच्या म्युनिसिपल शाळेजवळील एका कचराकुंडीत रात्री अकराच्या सुमारास स्थानिक रहिवाशांना अर्भक दिसले. त्यांनी विनोबा भावे पोलिस ठाण्यात त्याची माहिती दिली. यापैकी चार महिन्यांचे एक स्त्री भ्रूण व दुसरे भ्रूण दोन महिन्यांचे आहे. दुसऱ्या भ्रूणाचे लिंग मात्र समजू शकले नाही. गुरुवारीच खारदांडा येथील वारीन पाडा भागातील कचराकुंडीत एका दिवसाचे स्त्री अर्भक मृतावस्थेत सापडले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सीनिअर इन्स्पेक्टर मंगेश पोटे यांनी दिली.
शुक्रवारी नेरुळ सेक्टर-१० येथे सुमारे दोन महिन्याचे भ्रूण आढळले. मात्र त्याचे लिंग समजू शकले नाही. ही भ्रूणहत्या आहे का अनैतिक संबंधामुळे गर्भपात करून ते कचराकुंडीत टाकले आहे का याचा तपास महापालिका आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन करीत आहे. आरोग्य विभागाने नेरुळ परिसरातील नर्सिंग होमची चौकशी सुरू केली असून दोन दिवसांत अहवाल सादर होईल.
पुण्यातही ...
पुणेः पुण्यातील मुंढव्यात राहणाऱ्या कविता येमगर यांनी गुरुवारी पहाटे दोन मुलींना जन्म दिला. ही ' प्रीमॅच्युअर डिलिव्हरी ' असल्याने त्या मुली मृत्यू पावल्याच्या समजातून त्यांनी दोन्हीही अर्भके नदीत टाकली. जुळ्या मुली झाल्याने नैराश्यातून येमगर यांनी ती नदीत टाकली , की त्यांच्या म्हणण्यानुसार मृत अर्भकेच जन्माला आल्याने ती फेकून दिली , या संदर्भात पोलिस तपास करीत आहेत.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply