Home » sindhu news »
सावंतवाडीत आता विधी महाविद्यालय
सावंतवाडी- दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये येत्या सप्टेंबर महिन्यापासून विधी महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र सुरू होत असल्याची माहिती दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राजमाता सत्त्वशीलदेवी भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
येथील पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एम. डी. देसाई, उपाध्यक्ष पी. एफ. डान्टस, मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक दादासाहेब मोरे, प्रा. जी. ए. बुवा उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, ""येथील पंचम खेमराज विधी महाविद्यालयाला शासनाची मान्यता मिळाली आहे. मुंबई विद्यापीठानेही मान्यतेचा हिरवा कंदील दाखविला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेचा अभ्यासक्रमच येथे शिकविला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरी, व्यवसाय असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना इच्छा असूनही इतर ठिकाणी प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करता येत नाही. नोकरी, व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळून इच्छुकांना कायद्याची पदवी घेता यावी, म्हणून ही व्यवस्था केली आहे. कायद्याची पदव्युत्तर पदवी संपादन केलेले प्राध्यापक येथील विधी महाविद्यालयात मार्गदर्शन करतील.''
ते म्हणाले, ""सावंतवाडी संस्थान ऐतिहासिक काळापासून न्यायदानासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच "न्यायनीतिज्ञ राजा' अशा शब्दांत गौरव केला होता. महाराष्टातील अनेक नामवंत वकील शिवरामराजे भोसलेंचा उल्लेख कायदेपंडित असाच करत. याच परिसरातील वाय. व्ही. चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश झाले. सुमन पंडित उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. सावंतवाडीत विधी महाविद्यालय सुरू करण्याचा शिवरामराजेंचा मानस होता. त्याकरिता त्यांनी काहीसे प्रयत्न केले होते. त्यांचे स्वप्न आता फलद्रुप झाले आहे.''
श्री. डान्टस म्हणाले, ""पदवी उत्तीर्ण व्यक्तींना या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. विधी महाविद्यालयासाठी निधीची उपलब्धता, शिक्षक वर्ग, ग्रंथालय अशा अनेक समस्या होत्या. या सर्वांची पूर्तता करण्यासाठी श्री. देसाई यांनी परिश्रम घेतले. त्यामागे संस्थेचे अध्यक्ष खेमसावंत भोसले व कार्याध्यक्ष राजमाता भोसले यांची प्रेरणा व प्रोत्साहन होते. ऍड. सुभाष देसाई यांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे आहे. या सर्वांच्याच प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे मुंबई विद्यापीठाने तसेच शासनाने नुकतीच संस्थेस लॉ कॉलेजसाठी परवानगी दिली.''
चव्हाण मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्राच्या निर्मितीस प्राधान्य देत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्याचे कार्यालय येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात कार्यरत होत असल्याचे श्री. मोरे यांनी सांगितले. नाशिक विद्यापीठाच्या कार्यालयाने त्यास अनुमती दिली आहे. राजमाता, श्री. देसाई, डॉन्टस, केंद्रसंयोजक म्हणून डॉ. जी. ए. बुवा, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी सहकार्य दिल्यानेच हे केंद्र सुरू होत असल्याचे श्री. मोरे यांनी सांगितले. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर 5 जूनला सकाळी साडेदहा वाजता विभागीय केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या केंद्रात कायमस्वरूपी पाच कर्मचारी असतील. सकाळी दहा ते सहा या वेळेत विभागीय केंद्राचे कार्यालय विद्यार्थ्यांसाठी खुले राहील. दरम्यान, विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाचीही व्यवस्था केली आहे.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply