‘गरजनेवाले बरसते नही’
भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य प्राप्त करुन 66 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 66 वर्षात आपण बरेच काही कमावले तर बरेच काही गमावले. पण आज भारतीय जनतेला सगळ्यात जास्त गरज आहे ती भारताचे नेतृत्व थेट निवडण्याची. भारतात पंतप्रधानाच्या हाती देशातील महत्त्वाची सर्व सूत्रे असतात. पण त्या पंतप्रधानाची शक्ती ही त्या त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाकडे असते, त्यामुळे बर्याच वेळा पंतप्रधान एखादा निर्णय घेताना आपल्या पक्षप्रमुखाकडे पाहतो व त्यानंतर तो निर्णय घेतो. यामुळे आपल्या देशाला आजपर्यंत अनेकवेळा अडचणींना सामोरे जावे लागले आहे. वारंवार पाकिस्तान सारखा देश भारताच्या सैनिकांना भारतात घुसून ठार मारत आहे. आपले पंतप्रधान पाकिस्तानला दम भरण्याशिवाय काहीच करीत नाही. नेहमीच पाकिस्तान किंवा चिन सारखे देश भारताची कुरापत काढत असतात व आपले पंतप्रधान त्यांना ‘हम ऐसा फिर नही सहेंगे’ असं प्रत्येकवेळी म्हणत असतात. आता तर पंतप्रधान एखादी घटना घडल्यावर परत गरजणार पण बरसणार नाही हे नक्कीच. आता तर ही म्हण खरी होताना प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायला मिळत आहे. ‘गरजनेवाले, बरसते नही.. और बरसनेवाले गरजते नही.’ भारतातील जनतेला यापुढे पंतप्रधानाची नेमणूक ही थेट करण्याचा अधिकार मिळावा जेणेकरुन पंतप्रधान एखादा निर्णय घेताना पक्ष डोळ्यासमोर न ठेवता तो फक्त जनतेला डोळ्यासमोर ठेवेल व देशाला एक उत्तम नेतृत्व प्राप्त करुन देईल.
सचिन दळवी
सचिन दळवी

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply