Home » Posts filed under kudal
कुडाळ नळ योजनेचे काम सुरू करा
कुडाळ : शहराची पूरक नळ-पाणी योजना पूर्ववत करण्यासाठी ग्रामपंचायत निधीतून 28 लाख, तर देखभाल व दुरुस्तीतून 11 लाख 73 हजारांची तरतूद करून हे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. निकिता परब यानी आज दिले.
कुडाळ शहर ग्रामपंचायतीची 5 कोटी 28 लाखांची नळ योजना 2004 मध्ये मंजूर झाली. 10 टक्के लोकवर्गणीतून 26 लाख रुपये जमा करण्यात आले होते. एकूण 52 लाख रुपये भरायचे होते. लोकवर्गणीअभावी या नळ योजनेची कामे रखडली होती. अलीकडेच या योजनेची मुख्य विहीर कोसळल्याने शहरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री नारायण राणे यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली होती. हा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज सौ. परब यांनी ही बैठक आयोजित केली होती. ही योजना पूर्ववत होण्यासाठी 39 लाख 74 हजार रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे भरणा केल्यानंतर कामाला सुरवात होणार आहे. यावर आज चर्चा झाली. यात ग्रामपंचायत विभागाकडून 28 लाख कर्ज स्वरूपात घेण्याचे ठरले, तर जिल्हा परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती निधीतून 11 लाख 73 हजारांची तरतूद केली जाईल, असे सौ. परब यांनी सांगितले. निधी उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ या कामाला सुरवात केली जाईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता घोडके, श्री. चिटणीस यांनी सागितले. जूनमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत हा विषय उपस्थित करून शहराचा पाणीप्रश्न तत्काळ सोडविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने कार्यरत राहावे, अशा सूचना सौ. परब यांनी दिल्या. सुरवातीला सौ. परब यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रशांत राणे यांनी स्वागत केले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, गटविकास अधिकारी आर. के. जोशी, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सदस्य आशा आळवे, नितीन सावंत, सुरेश राऊळ, विलास कुडाळकर, राकेश कांदे, संदीप मांजरेकर, कल्पना सावंत, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. कुंभार आदी उपस्थित होते.

Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud