Featured Posts
Recent Articles

सावंतवाडीत केबीनसाठी कलगीतुरा रंगण्याची चिन्हे

अमोल टेंबकर - सकाळ वृत्तसेवा
 सावंतवाडी - येथील पंचायत समिती सभागृहात विरोधी बाकावर बसणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आपल्याला बसण्यासाठी वेगळी केबीन द्यावी, अशी मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे; मात्र वेगळी केबीन करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. वेगळी जागा द्यावी, अशी कोठेही तरतूद नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे केबीन प्रश्‍नावरून सत्ताधारी व विरोधकांत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. यावर कशा पद्धतीने सुवर्णमध्य काढला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

येथील पंचायत समितीत निवडून आल्यानंतर केवळ शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान उपसभापती विनायक दळवी यांनी आयत्यावेळी शिवसेना सोडून कॉंग्रेसचा तंबू गाठल्याने व भाजपच्या रेश्‍मा कोरगावकर यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर आली. सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे कॉंग्रेसकडे असल्याने दोघांच्या केबीनमध्ये जाणे विरोधकांना शक्‍य नाही. त्यामुळे आता आपल्याला बसण्यासाठी वेगळी केबीन द्या, अशी मागणी त्यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे. या विषयावर आगामी काळातील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर विरोधकांना कोणती जागा द्यावी, यावर खलबते रंगण्याची चिन्हे आहेत.

शासनाच्या नियमानुसार विरोधी सदस्यांना वेगळी केबीन देण्याची कोणतीही तरतूद नाही. सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीत वेगळी केबीन करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्‍न प्रशासनासमोर आहे; मात्र याचे काय करावे, याबाबतचा निर्णय मासिक बैठकीत घेण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे पंचायत समिती गटनेते अशोक दळवी यांच्याशी संपर्क साधला असता, आवश्‍यक विषयावर तसेच एखाद्या विकासकामांवर सहकारी सदस्य, अधिकाऱ्यांशी चर्चा करता यावी. भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांशी चर्चा करता यावी, यासाठी आम्ही सर्व विरोधी सदस्यांनी या केबीनची मागणी केली आहे. त्यासाठी आवश्‍यक जागा पंचायत समितीत उपलब्ध आहे. त्यामुळे सदस्यांच्या मागणीचा आदर करून गटविकास अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आपली मागणी असणार आहे. अंतिम निर्णय त्यांच्याच हातात आहे, असे त्यांनी सांगितले.

विकासकामांवर सहकारी सदस्य, अधिकाऱ्यांशी चर्चा करता यावी. भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांशी चर्चा करता यावी, यासाठी आम्ही सर्व विरोधी सदस्यांनी केबीनची मागणी केली आहे. त्यासाठी आवश्‍यक जागा पंचायत समितीत उपलब्ध आहे.
-अशोक दळवी, पंचायत समिती गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Share and Enjoy:

0 comments for this post

Leave a reply

We will keep You Updated...
Sign up to receive breaking news
as well as receive other site updates!
Subscribe via RSS Feed subscribe to feeds
Sponsors
Template By SpicyTrickS.comSpicytricks.comspicytricks.com
Template By SpicyTrickS.comspicytricks.comSpicytricks.com
Popular Posts
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud