Home » Sport News »
कोलकाता 'सुपर किंग'
वृत्तसंस्था । चेन्नई
प्लेऑफमध्ये टेबल टॉपर्स दिल्ली , तर फायनलमध्ये गतविजेत्या चेन्नईला हरवून कोलकाता नाईट रायडर्सने दिमाखात आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले आणि यंदा पहिल्यांदाच आपण ' सुपर किंग ' असल्याचे दाखवून दिले .
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला थरार , कोलकात्याच्या मनविंदर बिसलाने ४८ चेंडूत पाच षटकार व आठ चौकारांसह चोपून काढलेल्या ८९ धावा हे कोलकात्याच्या डावाचे वैशिष्ट्य ! यामुळे १९१ धावांचे आव्हान कोलकात्याने १९ . ४ षटकांत पार केले . यंदा प्रथमच कोलकात्याने आयपीएलच्या बाद फेरीत प्रवेश केला आणि या पहिल्याच खेपेत त्यांनी जेतेपदावर दिमाखात नावही कोरले हे विशेष !
अखेरच्या षटकात कोलकात्याला ११ धावांची आवश्यकता होती . ढोणीने चेन्नईसाठी लकी असलेल्या ब्राव्होच्या हातात चेंडू सोपविला . पहिल्या दोन चेंडूंवर त्याने दोन धावा दिल्या , पण तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मनोज तिवारीने कोलकात्याचा विजय साकारला . प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई १९१ धावांचे आव्हान उभारले तेव्हा जाणकारांसह अनेकांनी चेन्नईच हॅट् - ट्रिक करणार असा ' कौल ' दिला होता . पण ; ' हरयाणवी ' बिसलाने कोलकात्याला थेट कपच जिंकून दिला ...
शाहरूख खूष , माफीही मागितली
कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खान भलताच खुषीत होता . चिदंबरम स्टेडियमवर त्याने आपल्या आवडत्या कोलांटउड्या मारल्या तसेच एमसीएच्या वानखेडे स्टेडियमवर त्याच्याकडून झालेल्या गैरवर्तनाबद्दल त्याने माफी मागितली .

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply