Home » sindhu news »
मळगावात टंचाईची तीव्रता वाढली
- सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी - टंचाईमुळे मळगावमध्ये ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सार्वजनिक विहिरीवर रात्री-अपरात्रीही पाणी भरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
मळगाव ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे गावात नळपाणी योजना असूनही गावातील लोकांना पाण्यासाठी रात्रीच्यावेळी फिरावे लागत आहे.
मळगाव ग्रामपंचायतीची नळपाणी योजना बंद आहे. ती आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते; मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. परिणामी पाण्यासाठी लोकांना विहिरीवर जावे लागत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने तसेच आटल्याने पायपीट करावी लागत आहे. अनेकांच्या दारात ग्रामपंचायतीचे नळ असतानाही अशा समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य दखल घेऊन गावाला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
तेथील नळ योजनेमधून अनेकांनी नळ घेतले; मात्र त्याला मार्चपासून बऱ्याच ठिकाणी पाणीच येत नसल्याची स्थिती आहे. नियोजनाअभावी ही स्थिती ओढवल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
बोअरवेलमुळे पाणीपातळी घटली
मळगावात काही ठिकाणी बोअरवेलही मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणीपातळी आणखी वेगाने कमी झाली आहे. सध्या गावातील बऱ्याच विहिरीही आटल्या आहेत. खासगी विहिरी आटल्याने लोकांना सार्वजनिक तसेच घरापासून दूर असलेल्या विहिरींपर्यंत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पहाटेपासून पाण्यासाठीची परेड सुरू असते. काही ठिकाणी तर रात्रीच्यावेळीही पाणी भरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply