सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद आरोग्य सेवकांसह पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी आदी पदांच्या भरतीतील मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती 12 तारखेला सकाळी 10 वाजता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8 वाजल्यापासून कागदपत्राची पडताळणी संबंधित कार्यालयात करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. तर मुलाखतीनंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
0 comments for this post
Leave a reply