Featured Posts
Recent Articles

तमसो मा ज्योतिर्गमय

Adop babbyविवाहानंतर जीवनात घडणारी सर्वात आनंदाची घटना म्हणजे अपत्यप्राप्ती. आई - वडील बनण्याचा जो आनंद असतो तो आणखी कोणत्याही नात्याने मिळत नाही. स्वत:च मुलं म्हणजेच आपला दुसरा जन्म असतो. कदाचित यालाच पुर्नजन्म असं म्हटलं असेल. कारण जो जन्माला आलेला असतो तो आपलाच एक अंश असतो. पण आपल्या देशात आजही अशी असंख्य जोडपी आहेत की ज्यांना या सुखाचा आनंद घेता येत नाही. मग अशी जोडपी, देवधर्म, औषधपाला, जडीबुटी, डॉक्टरांच्या सल्ला, टेस्ट ट्यूब बेबी, व आता सरोगेसी अशा अनेक गोष्टींच्या मागे लागतात. जे अभिनेते शाहरूख खानसारखे श्रीमंत आहेत अशी व्यक्ति टेस्ट ट्यूब बेबी किंवा सरोगेट मदर सारखा महागडा पर्याय निवडतात. पण मध्यम वर्गीयांना या गोष्टीचा ङ्गायदा घेता येत नाही. मग अशांनी काय करावे? अशा जोडप्यांसाठी काही पर्याय उपलब्ध आहेत त्यातील सर्वात प्रसिद्ध आणि थोडा सोपा मार्ग आहे ‘अनाथालय.’
आज भारताची लोकसंख्या ही 120 कोटींच्या घरात असली तरी हजारो विवाहित जोडपी अशी आहेत की ज्यांना स्वत:ची अशी मुले नाहीत. त्यातील बहुतेक जोडपी सर्व उपाय करुन थकलेली असतात, त्या सर्वांसाठी अनाथालय हाच सर्वोत्तम उपाय आहे. गोव्यात व महाराष्ट्रात अशी काही सरकारमान्य अनाथालये आहेत जी अशा जोडप्यांना जगण्यासाठी नवीन आधार देतात. एका संस्थेच्या सर्वेक्षणानुसार देशात आज अनाथ, निराधार, विशेष गरजयुक्त, एचआयव्ही बाधित, काळजी वा स्वरक्षणाची गरज असणार्‍या शाळाबाह्य अशा मुलांची एकूण संख्या सुमारे 75 लाखांच्या आसपास आहे व यात दरवर्षी अंदाजे 4 लाख नवीन मुलांची भर पडते. वरील सर्व आकडे हे एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आलेले आहेत. पण सरकारच्या ‘कारा (उअठअ) संस्थेच्या संकेतस्थळावर ङ्गक्त दत्तक विधानांची आकडेवारी मिळू शकते. अशा मुलांसाठी सरकारही शिक्षण विभाग, महिला बाल विकास विभाग, समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग या द्वारे काम करतच असते. शिक्षणाचा मुलभूत हक्क देणारा कायद्याअंतर्गत माध्यान्ह आहार अशी कामे सरकार करतेच, अशा मुलांना सरकार आपल्यापरीने मदत करतच असते. अनाथ मुलांसाठी अनेक सामाजिक संस्था काम करत असतात. उदा. गोव्यातील सामाजिक काम करणारी महाराष्ट्रातील संस्था स्नेहालय, अहमदनगर या संस्था आहेत ज्या अशा मुलांसाठी सामाजिक कार्य करत असतात. पण अशा अनाथ मुलांना खरी गरज आहे खर्‍या आधाराची गरज आहे ती आईवडीलांची. ज्या जोडप्यांना स्वत:चे मुल नाही त्यांनी नि:संकोचपणे अशा संस्थांना भेट देऊन त्यांचे प्रथम कार्य समजून घ्यावे, वाटल्यास तेथील मुलांसोबत थोडा वेळ घालवून त्या मुलांचे दु:ख समजून घ्यावे व एका का होईना पण मुलाला आपलं बनवून घरी आणावं. त्याला त्याचे आईवडील व तुम्हाला तुमचे मुलं मिळेल. झाशीची राणी ज्या प्रकारे लढली त्याचा आदर्श सवर्र्जण घेतात पण त्या राणीने ज्याप्रकारे आपल्या दत्तक मुलाला सांभाळले व आपल्या पाठीला बांधून ज्या प्रकारे त्याला सांभाळले हा आदर्श आपण कधी घेणार?
सरकार या अशा मुलांसाठी काही योजना करते पण मुलांना पालकांनी दत्तक घेण्यासाठी पालकांमध्ये जागृती करण्यात सरकार नक्कीच कुठेतरी कमी पडत आहे. जर सरकारने दत्तक मुलं घेणार्‍या किंवा घेतलेल्या पालकांसाठी काही योजना सुरू केल्या उदा. टॅक्समध्ये सूट, काही सरकारी योजनांचा लाभ, किंवा गृहकर्जावर सूट अशा जर काही योजना राबवल्या तर या अनाथांसाठी नाथ नक्कीच भेटणार. ज्यांना दत्तक घेणे शक्य नाही अशा लोकांनीही अशा शासनमान्य सामाजिक संस्थेला जोडून घेऊन त्यांना आर्थिक किंवा इतर मदत देऊन आपण आपलाही खारीचा वाटा उचलू शकतो.
या विषयात लिहीण्यासारखे खूप काही आहे पण आपल्या देशातील जनता आता हूशार झालेली आहे त्यामुळे तिला जास्त सांगण्याची गरजच नाही आहे ती जनता योग्य निर्णय घेणार व ज्यांना अपत्य नाही ते अशा संस्थांशशी नक्कीच संपर्क साधून या अनाथांना आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग नक्कीच बनवणार.
सरकारमान्य संस्था : स्नेहालय संस्था, अहमदनगर
241 - 327593(www.snehalaya.org)
- सचिन दळवी

Share and Enjoy:

0 comments for this post

Leave a reply

We will keep You Updated...
Sign up to receive breaking news
as well as receive other site updates!
Subscribe via RSS Feed subscribe to feeds
Sponsors
Template By SpicyTrickS.comSpicytricks.comspicytricks.com
Template By SpicyTrickS.comspicytricks.comSpicytricks.com
Popular Posts
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud