Home » Archives for February 2012
सुख – समृद्धी – समाधान
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
शाश्वत शुभेच्छाच माणसाला
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!
वजन कमी करण्यासाठी
आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.
१२) जस्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.
१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.

कुशाग्र बुध्दी साठी
तीन स्टेप प्रोग्रॅम:
ज्ञान ग्रहण करण्यासाठी शरीर पाच ज्ञानेंद्रियांचा प्रामुख्याने उपयोग करते. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अशा पाच इंद्रियांना पंचज्ञानेंद्रिय म्हणतात. ह्या इंद्रियांमुळे मेंदू पर्यंत ज्ञान संवेदना पोचविण्याचे कार्य शरीर सहज करू शकते. हे काम योग्य प्रकारे होण्यासाठी ही पाचही इंद्रिये स्वच्छ, तंदुरुस्त व त्यांच्या माध्यमाने संवेदना वहन करण्यासाठी असलेल्या नाड्या (Nerves) योग्य प्रकारे स्निग्धता युक्त (properly lubricated) असणे आवश्यक आहे. सर्दी झाली की वास येत नाही हे अगदी नेहमीच्या बघण्यातले उदाहरण. म्हणजे त्या इंद्रियामधे निर्माण झालेल्या दोषामुळे वासाची संवेदना मेंदूपर्यंत जात नाही. स्निग्धता इंद्रियांना किती आवश्यक आहे हे समजण्या साठी एक वाक्प्रचार आपण लहान पणा पासून ऐकत आलो आहोत, “डोळ्यात तेल घलून पहा, किंवा डोळ्यात तेल घलून लक्ष दे” म्हणजेच ज्ञानेंद्रियांची शक्ती किंवा कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी तेल किंवा तुपा सारखा स्निग्ध पदार्थ किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. आयुर्वेदात तुपाच्या गुणधर्मां विषयी फार सुंदर वर्णन केले आहे, ते असे:“शस्तं धी स्मृति मेधाऽग्नि बलायुः शुक्र चक्षुषाम्….” म्हणजेच बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त १.५ मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशर, जेष्टमध, अश्वगंधा सारख्या वनस्पतींचा अर्क गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारा मुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात. कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो. हे नस्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर करणे योग्य आहे. ह्या वेळी केल्याने अधिक फायदा होतो. नाकात थेंब टाकल्या नंतर ५ मिनिटे आडवे पडून राहावे. कधी कधी हे औषधी तूप घशात उतरल्या सारखे जाणवते. त्यावर घोटभर कोमट पाणी प्यावे. मेंदूची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता म्हणजेच आकलन शक्ती चोख राहते व त्या मधे काही अडथळा न येता विषयांचे आकलन सहज होते.
दुसरी पायरी: ज्ञान योग्य प्रकारे साठवण्या करिता आवश्यक अशी रचना मेंदूच्या पेशींमध्ये घडवून आणण्याचे कार्य ह्या मुळे होते. ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी, अश्वगंधा सारख्या वनस्पतींमुळे मेंदूच्या पेशींमधील प्रथिनांचे संहनन सुधारते असे शास्त्रीय प्रयोगां मधे आढळून आले आहे. वाचनालयात नवीन पुस्तकांची भर पडली तर कपाटांची संख्या वाढवावी लागते त्याच प्रमाणे अभ्यास वाढू लागला की मेंदूच्या क्षमते मधे वाढ करावी लागते. सध्या बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक सर्व औषधे ह्याच प्रकारे कार्य करतात. ह्या औषधांचा उपयोग होण्याची सुरुवात साधारणतः १५ दिवसांत होते. हा फरक थर्मोमीटर ने ताप मोजण्या इतका सहज मोजता येत नही हे खरे पण मेंदूच्या क्षमते मधे वाढ कशी होते हे देश-विदेशी झालेल्या असंख्य प्रयोगांमधे निर्विवाद पणे सिद्ध झाले आहे. शिवाय दीर्घकाळ पोटात घेऊन काही दुष्परिणाम होत नाही असे अभ्यासकांचे ठाम मत आहे. ह्या वनस्पतींचे इतर अनेक गुण आहेत. रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण सुधारते, रोग-प्रतिकार शक्ती सुधारते, स्नायूंचे बळ वाढते, कॅल्शियमची झीज भरून निघते, स्टॅमिना वाढतो, जखमा लवकर भरून निघतात, केसांमधील मेलॅनिन वाढते त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते. बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन घेतांना मात्र त्यामधील घटकांचे प्रमाण योग्य आहे ह्याची खात्री करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात घटक असण्यामुळे अपेक्षित गुण ठराविक कालावधी मधे मिळू शकत नाही. मुलांसाठी उत्पादन घेतांना चवीचा विचार करणे आवश्यक आहे. ह्या सर्व वनस्पती चांगल्याच कडू असतात त्यामुळे मुले नियमित पणे घेतील की नाही? नियमित पणे घेण्यासठी आवडीची चव आणि स्वाद असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तोंड वाकडे करीत कसेतरी घशाखाली ढकललेल्या औषधाचा उपयोग जेमतेमच होईल. मुलाने आपणहून मागणी करावी अशा छान छान चवींची उत्पादने आता सहज मिळू लागली आहेत.
सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी: केलेला अभ्यास बरोबर योग्य वेळी आठवणे ह्याला स्मरणशक्ती म्हणतात. स्मरणशक्तीची यंत्रणा मेंदूच्या विशिष्ट भागातून नियंत्रित केली जाते. त्याला योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नाकाच्याच मार्गाचा उपयोग होतो. फीट आल्यावर कांदा फोडून नाकाजवऴ धरतात व त्याच्या उग्र वासाने बेशुध्द अवस्थेतून झटकन शुध्द येते. विशिष्ट वास घ्राणेंद्रिया द्वारे घेण्यामुळे मेंदूतील स्मरणयंत्रणा कार्यरत होते. ह्या विषयी जर्मनी मधे काही संशोधकांनी प्रयोग केले. विद्यार्थ्यांच्या एका समूहाला एक चाचणी प्रश्नसंच देऊन एका खोलीत झोपण्याची व्यवस्था केली. झोपेत असतांना त्या खोलीत विशिष्ट सुगंधाची रात्री ४/५ वेळा फवारणी केली. त्या त्या वेळी मेंदूचा एफ् एम् आर् आय् (fMRI) स्कॅन घेतला. तेव्हां मेंदूतील हिपोकॅम्पस ची क्रिया अधिकच गतिमान होते असे लक्षात आले. दुसरा दिवस उजाडल्या नंतर त्यांची परीक्षा घेतली त्यावेळी त्यांना ९७ % उत्तरे अचूक सांगता आली. ज्या खोलीत अशी फवारणी केली नव्हती त्यांची फक्त ८४ % उत्तरे अचूक आली. ह्या वरून आपल्याला लक्षात येते की विशिष्ट वासामुळे मेंदूतील स्मरण शक्ती अधिक कार्यरत होते. ह्या संशोधनावर आधारित वेखंड, जटामांसी, वाळा इ. सुगंधी वनस्पतीं पासून एक औषधी अगरबत्ती तयार केली. अभ्यास करतांना व रात्री झोपतांना खोलीत ही अगरबत्ती लावावी. हा उपाय करण्याने अभ्यास केलेला विषय मेंदूतील स्मरणयंत्रणेमध्ये पक्का बसतो व योग्य वेळी आठवण करून देण्यासाठी मदत करतो.
देवाची भक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार: देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे समजणे आपल्याला नक्कीच आवडेल. कॉर्टिझॉल नामक एक द्रव-पदार्थ (हॉर्मोन) भीती मुळे शरीरात निर्माण होतो आणि जेवढा अधिक कॉर्टिझॉल निर्माण होईल तेवढा तो मेंदूच्या पेशींना मारक किंवा घातक असतो हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिध्द झाले आहे. लहान मुलाला उंच फेकल्यावर तो हसतो कारण त्याला खात्री असते की आपल्याला वरती फेकणारा जो कोण आहे तो आपल्याला खाली पडू देणार नाही, आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही. देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळे नकळतणे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो ज्याने कोणत्याही संकट किंवा अडचणीच्या वेळी निर्माण होणारी भीती व त्याचा परिणाम म्हणून कॉर्टिझॉलचा आघात कमी होतो. अर्थात, मेंदूवर होणारा विपरीत परिणाम ह्या प्रकारे सहज टाळता येतो. घरातून बाहेर प्रवासाला जातांना देवाला आणि वडील माणसांना नमस्कार करण्यामागे हाच उद्देश होता. पूर्वी चांगले रस्ते, सुरक्षित वाहाने नव्हती. प्रवासासाठी बैलगाडी किंवा घोडे वपरले जात. शिवाय पाऊस, वादळ, खान-पान, जंगलातील प्राणी अशा अनेक संकटांचा सामना करण्याचे धैर्य फक्त देवभक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळेच मिळू शकते. संकट प्रसंगी तातडीचा नेमका आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ह्या एकाच गोष्टीमुळे शक्य होते.
नियमित व्यायामाचे महत्त्व: कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशीर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पीळदार दिसते खरे, पण अशा पीळदार शरीरयष्टी वाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोळामासाच असते, त्यांची बौध्दिक क्षमता बेताची असते, लहानशा अपघातने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांस धातूच्या पोषणासाठी वापरले जातात, परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते. थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानां पेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात.
बुध्दीचा व्यायाम: नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुद्रुढ आणि बलवान होतात तसेच बुध्दीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवाची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुध्दीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजे. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे कधीही न विसरण्या इतका पक्का होतो. अभ्यास शब्दाचा खरा अर्थ आहे ‘तीच तीच गोष्ट वारंवार करणे’.
आहारा बद्दल थोडेसे: मनुष्य शरीराची रचना घडवतांना निर्मात्याने फक्त शाकाहाराच्या पचनासाठी योग्य अशी यंत्रणा घडवली आहे. त्यामुळे ज्यांना मांसाहाराची आवड असेल त्यांनी आठवड्यातून एक वेळा पेक्षा जास्त मांसाहार करू नये. आयुर्वेदात पंचखाद्य नावाचा एक चविष्ट पदार्थ वर्णन केला आहे. खारीक, खजूर, खोबरं, खसखस आणि खडीसाखर अशा ‘ख’ ने सुरुवात असलेल्या पाच गोष्टी एकत्र करून झकास चवीचा हा पदार्थ मधल्या-सुटी साठी फार आवडीचा मेनू होऊ शकतो. हा नुसता ‘सुका-मेवा’ नव्हे तर खरोखर ‘बौध्दिक-मेवाच’ आहे.
ह्या उपायांना प्रयोगात्मक समजू नये. शास्त्रीय पध्दतीने प्रयोग करून अनेकांनी आपले अभिप्राय (testimonials) दिले आहेत.
भोजनातील हानिकारक संयोग
दृष्टीदोष
डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.त्वचारोग
सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.श्वास खोकला
श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.अतिसार
काही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही. त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते.कृमी
लहान बालके, मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष उत्पन्न झालेला असतो. यावेळी मध घेत जावा.गॅस होणाऱ्यास मध व लिंबू रोज द्या
ज्या व्यक्तिंना गॅसेस होतात. अशी तक्रार असते. भूक लागत नाही, उत्साह नसतो. काम करण्याची इच्छा नसते. कोणत्याही कामास कंटाळा येतो. नेहमी निरुत्साही वाटे. अशांनी रोज लिंबू रस (एक लिंबाचा) व मध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी काही खाण्यापूर्वी घेत जावे.कफ विकार
खोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो.मध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच घ्यावा, असे नाही.
चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.
पोटाच्या विकारांवर मध
रोज सकाळी एक पेलाभर थंड पाणी व चहाचे दोन चमचे मध एकत्र घेऊन चांगले एकजीव करुन घेणे. त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात . डोकेदुखी, हातापायास ठ्णका, संधिवात यावर मध चांगले औषध आहे. भूकपण चांगली लागते. (लहान मुलास एक चमचा मध देणे.)दुधा सोबत
दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत.दह्या सोबत
खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.तुपा सोबत
थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.मधा सोबत
मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.फणसा नंतर
पान खाणे हानिकारक असते.मुळ्या सोबत
गुळ खाणे नुकसान दायक असते.खीरी सोबत
खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.गरम पाण्याबरोबर
मध घेऊ नयेथंड पाण्याबरोबर
शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये.कलिंगडा बरोबर
पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.चहा सोबत
काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.माशा सोबत
दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.मांसा बरोबर
मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.गरम जेवणा बरोबर
थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.खरबुजा बरोबर
लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दहि नुकसान कारक असते.तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. ऍल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पाताळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.
फळांचे औषधी उपयोग
आंबा :

अंजीर :

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.
अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.
आवळा :

ऊस :

द्राक्षे :

पपई े :

लिंबु :

जांभूळ :

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.
डाळींब :

केळे :

स्ट्रॉबेरी :

छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे. एकदम पिऊ नये. उपयोग उत्तम होतो.
स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये. पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.
बोरे :

संत तुकाराम
संत तुकाराम
अखंड, अनाहत कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रह्मभूत झाली असे साक्षात्कारी ‘सत्पुरूष’; जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे व जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे ‘जगद्गुरू’ आणि भागवत धर्माचा कळस झालेले ‘संतश्रेष्ठ’!
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निभिर्र्ड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच,तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानते.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.
एका शुचिष्मंत घराण्यात पुणे जिल्ह्यातील देहू येथे शके १५३० मध्ये (इ. स. १६०८) वसंत पंचमी (माघ शु. पंचमी) या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इ. स. २००८ या वर्षी त्यांच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला.
भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। पिडू जे लागले सकळीक।।
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार।।
या शब्दांत त्यांच्या तपश्र्चर्येचे वर्णन केलेले आढळते.
सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करणे हेच संत तुकारामांचे जीवन होते. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ या वचनावरून पंढरपूरचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते. पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते.सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। पिडू जे लागले सकळीक।।
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार।।
या शब्दांत त्यांच्या तपश्र्चर्येचे वर्णन केलेले आढळते.
वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्य होय. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन; कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो.
उदाहरणार्थ,
‘‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’’
‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।’’
‘‘तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।’’
‘‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।’’
‘‘ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।’’
‘‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।’’
‘‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।’’
तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत, की असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सुमारे ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला.तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’’
‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।’’
‘‘तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।’’
‘‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।’’
‘‘ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।’’
‘‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।’’
‘‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।’’
‘आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा।।’, असे म्हणत तसेच,
सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावे तुम्ही।।
वाढवेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलावतो।।
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी।।
अंत:काळी विठो आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।
असे म्हणत ते फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) ब्रह्मलीन झाले. (शके पंधराशे एकाहत्तरी। विरोधक्ष नाम संवत्सरी। फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी। प्रथम प्रहरि प्रयाण केले।। अशी नोंद आढळते.)सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावे तुम्ही।।
वाढवेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलावतो।।
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी।।
अंत:काळी विठो आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।
श्रीसंत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.
जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।।
जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।।
समर्थ रामदास
समर्थ रामदास
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे। कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।
परमार्थ, स्वधर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, संघटन, प्रबोधन, समाजकारण, राजकारण, प्रपंच, काव्य, साहित्य, बलोपासना अशा अनेक विषयांचे सर्वस्पर्शी कर्ते, भाष्यकार आणि द्रष्टे, पुरोगामी राष्ट्रसंत म्हणजे समर्थ रामदास स्वामी!
श्री समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब येथे ठोसरांच्या घरात झाला. हे सूर्योपासक घराणे होते. समर्थांचे पाळण्यातले नाव नारायण. बालपणापासून नारायण आपल्या विचारांनी, आचारांनी असामान्य वाटत होता. नारायणाने लग्नाच्या बोहल्यावरून आत्मोध्दारासाठी नाशिक पुण्यक्षेत्री धाव घेतली. दक्षिण गंगा गोदावरीचा पावन परिसस्पर्श अनुभवला व प्रभू श्रीरामचंद्राचे सान्निध्यही अनुभवले. गायत्रीमंत्राचे पुरश्र्चरण व रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले.
‘धर्म संस्थापना जगजीवना। भरतखंडी करणे असे।’ यासाठी त्यांनी कठोर तपाचरण केले. टाकळी येथे संगमावर १२वर्षे तपाचरण केले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा मंत्र धारण केला. भारतभर तीर्थयात्रा केल्या. संपूर्ण देश पाहून परिस्थितीचा अंदाज घेतला. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्या-खोर्यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. समर्थांनी स्थापन केलेल्या केवळ श्री मारूती मंदिरांचा (त्या संख्येचा) अंदाज जरी आपण घेतला, तरी आपल्याला थक्क व्हायला होते. अक्षरश: शेकडो मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.
समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।
प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -
प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।
समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात.
परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.
याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,
बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।
मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,
‘येक म्हणजी मर्हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’
विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.
सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ‘दासबोधा’ चे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्या (आजही मार्गदर्शक ठरणार्या) समर्थांनी इ.स. १६८१ मध्ये सज्जनगडावर समाधी घेतली.
जय जय रघुवीर समर्थ!
समर्थांचे वाङ्मय:
`श्रीमत् ग्रंथराज दासबोध' या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.
आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी.
काही स्फूटरचना, भीमरूपी, मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या .
संत सावता महाराज
संत सावता महाराज
‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।’ असे म्हणत कर्मातच ईश्र्वर पाहणारे,
कर्मयोग अतिशय साध्य सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे,
थोर संत म्हणजे संत सावता महाराज.
कर्मयोग अतिशय साध्य सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे,
थोर संत म्हणजे संत सावता महाराज.
अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.
‘‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।’’
हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्र्वर भेटतो. तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।’’
‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’
असे म्हणणार्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे.
त्यांच्या सर्व अभंगरचना काशिबा गुरव यांनी लिहून घेतल्या आहेत. अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती.
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.
अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.
संत नामदेव म्हणतात -
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।
संत सावता महाराज हे संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. (संत ज्ञानेश्र्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. महाराजांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत.
अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
संत
संत श्री ज्ञानेश्वर
‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’
- श्रीस्वरूपानंद स्वामी
संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!
ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’

`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
‘शूचीनाम श्रीमतां गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते’ (भगवद् गीता ६.४१) अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी (आळंदी) हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले. त्यांचे वडीलबंधू कृपासिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते.
श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. (संत ज्ञानेश्र्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.) या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी साहित्य वजा (-) ज्ञानेश्वरी बरोबर (=) शून्य’. तर संत नामदेव महाराज म्हणतात,
‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।’
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकर्यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष!
`ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.
‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दांत करतात. -
‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’
‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’
सुविचार
- १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
- २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
- ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
- ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
- ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
- ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
- ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
- ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
- ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
- १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
- ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
- १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
- १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
- १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
- १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
- १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
- १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
- १८) आधी विचार करा; मग कृती करा.
- १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
- २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
- २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
- २२) अतिथी देवो भव ॥
- २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
- २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
- २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...
पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.
कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !
स्मरणशक्ती
गुरुजींनी विचारलं, "बाळू! शिवाजीमहाराजांचं एक वैशिष्ट्य तू सांगू शकशील का?"
बाळू - त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची.
गुरुजी - (आश्चर्याने) कशावरून?
बाळू - म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.
बाळू - त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची.
गुरुजी - (आश्चर्याने) कशावरून?
बाळू - म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.
झुरळ
हॉटेलमध्ये गेलेला एक इसम गरमगरम मिसळ खात असता त्याला त्या मिसळीत एक मेलेलं झुरळ सापडलं. त्याबरोबर मिसळ आणून देणाऱ्या पोऱ्याला हाक मारून तो रागानं म्हणाला, "या मिसळीत बघ, मेलेलं झुरळ आलंय!"
यावर तो पोऱ्या म्हणाला, "तुम्हा गिऱ्हाइकांना मिसळ तर गरमागरम हवी असते. मग गरम मिसळीतलं झुरळ जिवंत कसं राहील? उष्णतेमुळं ते मरणारच."
यावर तो पोऱ्या म्हणाला, "तुम्हा गिऱ्हाइकांना मिसळ तर गरमागरम हवी असते. मग गरम मिसळीतलं झुरळ जिवंत कसं राहील? उष्णतेमुळं ते मरणारच."
लाडू
दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या आईपाशी जाऊन मन्यानं तिला लडिवाळपणे विचारलं, "आई गं, स्वैपाकघरातील फडताळातल्या डब्यातला एक लाडू खाऊ का मी?"
"खा बरं बाळ. भूक लागलीय् का तुला?"
आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला, "आई! तू लाडू खायला परवानगी दिलीस, म्हणून मला किती हायसं वाटलं! कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता!"
"खा बरं बाळ. भूक लागलीय् का तुला?"
आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला, "आई! तू लाडू खायला परवानगी दिलीस, म्हणून मला किती हायसं वाटलं! कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता!"
`गीतारहस्य'
रस्त्यात दोन इसमांची भेट झाली. बोलता बोलता विषय टिळकांचा निघाला, तेव्हा पहिला म्हणाला, " लोकमान्य टिळकांचा `गीतारहस्य' हा ग्रंथ खरोखरच अलौकिक आहे नाही का?"
दुसरा-प्रश्नच नाही. त्या ग्रंथाल तोड नाही.
पहिला- तुम्ही वाचलाय का तो ग्रंथ?
दुसरा- नाही, पण तुम्ही?
दुसरा-प्रश्नच नाही. त्या ग्रंथाल तोड नाही.
पहिला- तुम्ही वाचलाय का तो ग्रंथ?
दुसरा- नाही, पण तुम्ही?
दाढी
गिऱ्हाईकाची दाढी करून झाल्यावर न्हाव्यानं त्याला विचारलं, "साहेब! माझा वस्तरा कसा काय काय वाटला तुम्हाला?"
गिऱ्हाईक म्हणाले," न्हावीदादा, तुमच्य वस्तऱ्याला खरोखरच जगात तुलना नाही. तुम्ही वस्तऱ्यानं माझी दाढी करीत आहात, असं मला वाटलंच नाही."
हे ऐकून एकदम खुषीत आलेल्या न्हाव्यानं विचारलं, "असं? मग मी तुमच्या गालांवरून वस्तरा फिरवीत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटत होतं?
गिऱ्हाईक म्हणाले, "खरं सांगायच तर, तुम्ही हाती खरखरीत पॉलिशपेपर घेऊन माझे गाल जोरात घाशीत असल्याचा मला भास होत होता."

पर्यटन :
पर्यटन :
थंड हवेची ठिकाणे :
अंबोली - सिंधुदुर्ग जिल्हा, | माथेरान - रायगड, | जव्हार - ठाणे, |
तोरणमाळ - नंदूरबार, | लोणावळा व खंडाळा - पुणे | महाबळेश्र्वर व पाचगणी-सातारा, |
पन्हाळा - कोल्हापूर, | चिखलदरा-अमरावती. | नर्नाळा - अकोला |
भंडारदरा - अहमदनगर, | म्हैसमाळ - औरंगाबाद |
प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळे :
धार्मिक पर्यटन स्थळ | जिल्हा |
पंढरपूर | सोलापूर |
तुळजापूर | उस्मानाबाद |
श्री महालक्ष्मी | कोल्हापूर |
पन्हाळ्याचा जोतिबा | कोल्हापूर |
अंबेजोगाई | बीड |
परळी-वैजनाथ | बीड |
शेगाव | बुलढाणा |
शिर्डी | अहमदनगर |
पैठण | औरंगाबाद |
घृष्णेश्र्वर | औरंगाबाद |
भीमाशंकर | पुणे |
देहू व आळंदी | पुणे |
औंध | सातारा |
जेजुरी | पुणे |
वणी | नाशिक |
त्र्यंबकेश्र्वर | नाशिक |
औंढ्या नागनाथ | परभणी |
गुरुद्वारा, | नांदेड |
महालक्ष्मी व हाजी अली | मुंबई |
अष्टविनायकाची स्थळे -
गाव | श्रीगणेशाचे नाव | जिल्हा |
थेऊर | श्रीचिंतामणी | पुणे. |
रांजणगाव | श्रीमहागणपती | पुणे. |
मोरगाव | श्रीमोरेश्वर | पुणे. |
ओझर | श्रीविघ्नेश्वर | पुणे. |
लेण्याद्री | श्रीगिरिजात्मक | पुणे. |
महड | श्रीविनायक | रायगड |
पाली | श्रीबल्लाळेश्वर | रायगड |
सिद्धटेक | श्रीसिद्धिविनायक | अहमदनगर |
प्रमुख ऐतिहासिक किल्ले
जिल्हा | किल्ल्याचे नाव |
रायगड | रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी, सुधागड, अवचितगड, सरसगड, तळे, घोसाळे इत्यादी. तसेच सागरी किल्ल्यांमध्ये खांदेरी-उंदेरी, कासा व मुरुड-जंजिरा |
पुणे | सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, राजगड, तोरणा, लोहगड इत्यादी |
सातारा | प्रतापगड, सज्जनगड, कमळगड, मकरंदगड, वसंतगड, केंजळगड, अजिंक्यतारा इत्यादी. |
कोल्हापूर | पन्हाळा, विशाळगड, गगनगड, भूदरगड इत्यादी. |
ठाणे | वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा (सागरी), गोरखगड इत्यादी. |
सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी), देवगड, इत्यादी. |
रत्नागिरी | सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नगड, जयगड, प्रचितगड इत्यादी. |
अहमदनगर | हरिश्चंद्रगड, रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला. |
औरंगाबाद | देवगिरी (दौलताबाद) किल्ला. |
नाशिक | ब्रह्मगिरी, साल्हेर - मुल्हेर इत्यादी. |
शिल्पे / लेणी :
अजंठा, वेरूळ, पितळखोरा लेणी - औरंगाबाद जिल्हा. भाज्याची लेणी, कार्ल्याची लेणी - पुणे जिल्हा.
घारापुरी लेणी-रायगड जिल्हा. खरोसा -लातूर ... इत्यादी
लोकसंख्या :
लोकसंख्या :
भारतीय जनगणना २००१ नुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
तपशील | संख्या |
एकूण लोकसंख्या | ९ कोटी ६८ लाख ७८ हजार ६२७ |
पुरुष | ५ कोटी ३ लाख ९७ हजार ४६० |
स्त्रिया | ४ कोटी ६४लाख ८१ हजार १६७ |
ग्रामीण लोकसंख्या (सुमारे) | ५कोटी ५७ लाख ७८ हजार |
शहरी लोकसंख्या (सुमारे) | ४ कोटी ११ लाख |
अनुसूचित जाती (एस.सी.) | ९८लाख ८२ हजार |
अनुसूचित जमाती (एस.टी.) | ८५ लाख ७७ हजार |
लोकसंख्येची घनता (प्रति चौ.कि. मी.) | ३१५ |
एकूण साक्षरता प्रमाण | ७६.९ % |
पुरुष साक्षरता | ८६.२%, |
स्त्री साक्षरता | ६९.३% |
स्त्री-पुरुष प्रमाण (स्त्रिया-प्रति हजार पुरुष) | ९२२ |
नागरी (शहरी) लोकसंख्येचे प्रमाण | ४२.४३% |
(महाराष्ट्राची मार्च, २००८ ची (प्रक्षेपित) लोकसंख्या १० कोटी ८० लाख आहे.)
संदर्भ : जनगणना २००१ नुसार
संदर्भ : जनगणना २००१ नुसार
दळणवळण :
दळणवळण :
रस्ते :
राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी २,३३,६६४ कि. मी. आहे. (सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या देखभालीखालील रस्ते)
रेल्वे :
राज्यातील रेल्वे मार्गाची एकूण लांबी ५९०२ कि.मी. आहे. (कोकण रेल्वे मार्गाची लांबी धरून). राज्यातील प्रमुख रेल्वे मार्गांची सूची पुढीलप्रमाणे,-
१. मुंबई - दिल्ली मार्ग (मध्य रेल्वेमार्ग)
२. मुंबई - अहमदाबाद मार्ग (पश्चिम रेल्वेमार्ग)
३. मुंबई - कोलकता मार्ग
४. मुंबई - चेन्नई
५. मुंबई - सिकंदराबाद
६. मुंबई - कोल्हापूर
७. दिल्ली - चेन्नई मार्ग (ग्रॅट - ट्रंक मार्ग)
८. भुसावळ - सुरत
महाराष्ट्राला सुमारे ७२० कि. मी. चा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्रात २ महत्त्वाची बंदरे आहेत
रस्ते :
राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी २,३३,६६४ कि. मी. आहे. (सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या देखभालीखालील रस्ते)
राज्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गांची सूची पुढीलप्रमाणे -
क्र. | राष्ट्रीय महामार्गाचे नाव | महामार्ग क्रमांक |
१ | मुंबई-नाशिक - आग्रा महामार्ग | ३ |
२ | मुंबई - पुणे - बेंगळूरू - चेन्नई | ४ |
३ | न्हावाशेवा - कळंबोली - पळस्पे | ४ ब |
४ | हाजीरा-सुरत-धुळे-नागपूर-कोलकाता | ६ |
५ | वाराणसी- नागपूर-हैद्राबाद-बेंगळूरू (कन्याकुमारी महामार्ग) | ७ |
६ | मुंबई-अहमदाबाद - जयपूर - दिल्ली | ८ |
७ | पुणे - सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडा | ९ |
८ | सोलापूर - विजापूर - चित्रदुर्ग | १३ |
९ | निजामाबाद - जगदलपूर | १६ |
१० | पनवेल - गोवा - मंगलोर | १७ |
११ | पुणे - नाशिक ५० | ५० |
राज्यातील रेल्वे मार्गाची एकूण लांबी ५९०२ कि.मी. आहे. (कोकण रेल्वे मार्गाची लांबी धरून). राज्यातील प्रमुख रेल्वे मार्गांची सूची पुढीलप्रमाणे,-
१. मुंबई - दिल्ली मार्ग (मध्य रेल्वेमार्ग)
२. मुंबई - अहमदाबाद मार्ग (पश्चिम रेल्वेमार्ग)
३. मुंबई - कोलकता मार्ग
४. मुंबई - चेन्नई
५. मुंबई - सिकंदराबाद
६. मुंबई - कोल्हापूर
७. दिल्ली - चेन्नई मार्ग (ग्रॅट - ट्रंक मार्ग)
८. भुसावळ - सुरत
मुंबई ते पणजी या मार्गावर धावणारी, कोकणातील सर्व जिल्हे जोडणारी कोकण रेल्वे हा महाराष्ट्रातील भूषणावह, आदर्श असा दळणवळण प्रकल्प आहे.
आंतरराष्ट्रीय विमातळ - मुंबई, पुणे व नागपूर या तीन ठिकाणांहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. आंतरदेशीय विमानतळे - मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर व नांदेड येथे आहेत.महाराष्ट्राला सुमारे ७२० कि. मी. चा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्रात २ महत्त्वाची बंदरे आहेत
१. मुंबई पोर्ट ट्रस्ट (एम.बी.पी.टी.)
२. न्हावाशेवा (जे. एन. पी. टी./ जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट) तसेच राज्यात ४८ छोटी बंदरे आहेत.
राज्यातील पोस्ट सेवेची कार्यालये मार्च, २००७ अखेर १२,५९९ होती. यांपैकी ११,३१५ ही ग्रामीण क्षेत्रात असून उर्वरित १२८४ शहरी क्षेत्रात आहेत.
मार्च ,२००७ अखेरपर्यंत राज्यात ६४.४४ लाख दूरध्वनी जोड (टेलिफोन कनेक्शन्स)होते.
सप्टेंबर, २००७ अखेरपर्यंत २७९.१४ लाख इतके मोबाईलधारक (भ्रमणध्वनीधारक) होते. त्यापैकी ११५.२५ लाख (४१.३%) हे केवळ मुंबई मंडल मध्ये होते.
सप्टेंबर, २००७ अखेरपर्यंत २७९.१४ लाख इतके मोबाईलधारक (भ्रमणध्वनीधारक) होते. त्यापैकी ११५.२५ लाख (४१.३%) हे केवळ मुंबई मंडल मध्ये होते.
प्रशासन :
प्रशासन :
मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर हे उपराजधानीचे ठिकाण आहे.
सध्या महाराष्ट्रात एकूण ३५ जिल्हे आहेत आणि ३५८ तालुके व ४३,७२२ खेडी आहेत.
प्रशासकीयदृष्ट्या महाराष्ट्राचे ५ विभाग पडतात. -
१.कोकण, २.पश्र्चिम महाराष्ट्र, ३.उत्तर महाराष्ट्र, ४. मराठवाडा, ५.विदर्भ.

नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था :
तपशील | संख्या |
१. जिल्हा परिषद | ३३ |
२. ग्रामपंचायती | २७,९१६ |
३. पंचायत समिती | ३५१ |
४. महानगरपालिका | २२ |
५. नगर परिषद | २२ |
६. नगर पंचायत | ०३ |
७. कटक मंडळ (कॅन्टॉन्मेंट बोर्ड) | ०७ |
वनक्षेत्र :
वनक्षेत्र :
वने - महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र सुमारे ६१, ९३९ चौ. कि. मी. आहे. भू-क्षेत्राच्या सुमारे २१% क्षेत्र वनाखाली आहे. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी कोणत्याही प्रदेशात क्षेत्रफळाच्या ३३% जमीन वनांखाली असणे गरजेचे आहे. प्रशासकीय विभागांनुसार सर्वात जास्त वनक्षेत्र नागपूर विभागात (२७,५५९ चौ. कि. मी.) आहे. तर सर्वात कमी वनक्षेत्र औरंगाबाद विभागात (२९१३ चौ. कि. मी.) आहे.
नाशिक विभाग - ११८२१ चौ. कि. मी. वनक्षेत्र.
अमरावती विभाग ९७२२ चौ. कि. मी. वनक्षेत्र.
पुणे विभाग - ६२३७ चौ. कि. मी. वनक्षेत्र.
जिल्ह्यांचा विचार करता राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात (सुमारे १३००० चौ. कि. मी.) आहे.
वनोत्पादने - इमारती लाकूड, जळाऊ लाकूड, बांबू, लाख, विड्याची पाने, अर्क व तेले, डिंक व राळ, कंदमुळे, फळे, तंतू, औषधी वनस्पती, प्राणिज पदार्थ इत्यादी वनोत्पादने राज्यात प्रामुख्याने सापडतात.
वनोद्योग - लाकूड कटाई, लगदा व कागद उद्योग, फर्निचर-प्लायवूड, विडी उद्योग, काडेपेट्या, फळ प्रक्रिया उद्योग, औषधी वनस्पती, अर्क- तेल उद्योग असे अनेक प्रकारचे वनांवर अवलंबून असलेले उद्योग राज्यात केले जातात.`पर्यटन' हा वनांशी जोडलेला आणखी एक महत्त्वाचा उद्योग होय.
राज्यातील राष्ट्रीय उद्याने :
१. ताडोबा राष्ट्रीय उद्यान - चंद्रपूर
२. नवेगाव राष्ट्रीय उद्यान - गोंदिया
३. बोरिवली राष्ट्रीय उद्यान (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) मुंबई उपनगर, ठाणे.
याशिवाय नागपूर जिल्ह्यात पेंच आणि अमरावती जिल्ह्यात गुगामल (मेळघाट) ही राष्ट्रीय उद्याने राज्यात आहेत.
प्रमुख अभयारण्ये :
राधानगरी- दाजीपूर अभयारण्य - कोल्हापूर. (गव्यांसाठी प्रसिद्ध)
चांदोली अभयारण्य - सांगली.
सागरेश्र्वर अभयारण्य - सांगली.
कोयना अभयारण्य - सातारा
माळणी पक्षी अभयारण्य (इंदिरा गांधी पक्षी अभरायरण्य) - सातारा.
भीमाशंकर - पुणे, ठाणे.
तानसा अभयारण्य - ठाणे
कर्नाळा पक्षी अभयारण्य - (महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य) - रायगड
नांदूर मध्मेश्र्वर अभयारण्य - नाशिक (हे अभयारण्य पाणपक्षांसाठी प्रसिद्ध आहे.)
देऊळगाव - रेहेकुरी अभयारण्य - अहमदनगर.
माळढोक पक्षी अभयारण्य - सोलापूर. (राज्यातील सर्वांत मोठे अभयारण्य)
गौताळा - औटरम घाट अभयारण्य - औरंगाबाद, जळगाव.
पाल-यावल अभायारण्य - जळगाव
किनवट अभयारण्य - नांदेड, यवतमाळ.
मेळघाट अभयारण्य - (राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प) - अमरावती.
बोर अभयारण्य - वर्धा.
नागझिरा अभयारण्य - गोंदिया
याशिवाय महाराष्ट्रात सागरी उद्याने आहेत.
आपल्या राज्यात सुमारे ८५ जातींचे सस्तन वन्य पशू, सुमारे ४६० जातींचे पक्षी, याशिवाय जमिनीवर सरपटणारे, पाण्यात राहणारे अनेक जातींचे प्राणी व कीटक वनांमध्ये आढळतात. वन्यजीवांमध्ये वाघ, बिबट्या, रानगवा, सांबर, चितळ, नीलगाय, अस्वल, माकड, तरस, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर हे पशू आढळतात. तर पक्ष्यांमध्ये बुलबुल, कोकिळा, सुतार, माळढोक, पोपट, हिरवे कबुतर, करकोचा, घुबड, मोर हे पक्षी तसेच स्थलांतर करणारी बदके, पाणकोंबडे, रोहित यांचा समावेश होतो.

खनिज संपत्ती :
खनिज संपत्ती :
महाराष्ट्रात सापडणार्या प्रमुख खनिजांची माहिती पुढे दिली आहे. तसेच ती खनिजे ज्या प्रमुख जिल्ह्यांत सापडतात त्या जिल्ह्यांचीही सूची दिली आहे.
१. भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.
जिल्हे - नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग.
२. भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे. -
जिल्हे - कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
३. कायनाईट - देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे. जिल्हा - भंडारा.
४. क्रोमाईट - देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर.
५. डेलोमाईट - देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे. -
जिल्हे - रत्नागिरी, यवतमाळ.
६. चुनखडी - देशातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी ९% साठे महाराष्ट्रात आहेत.
जिल्हे - यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर.
७. महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.
जिल्हे - नागपूर, चंद्रपूर,
८. भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिजसाठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, सिंधुदुर्ग.
९. ग्रॅनाईट - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सापडतो.
१०.तांबे - नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात सापडते.
११.अभ्रक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडते.
१२.टंगस्टन - नागपूर जिल्ह्यात सापडते.
१३.बेसॉल्ट खडक - दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
खनिज तेल : मुंबईनजीक समुद्रातील ‘मुंबई हाय’ या क्षेत्रात खनिज तेल, तसेच नैसर्गिक वायू सापडतात. रायगड जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आढळतात.

भारतातील सर्व प्रकारच्या खनिजांच्या सुमारे ३.३% खनिजांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण या दोनच भागात प्रामुख्याने खनिजे सापडतात. त्यामुळे याच भागात खनिजाधारीत उद्योगांचा विकास झालेला आढळतो. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ (एम.एस.एन.सी.) १९७३ मध्ये नागपूर येथे स्थापन करण्यात आले. त्याचा उद्देश खनिज संपत्तीचे जास्तीतजास्त उत्पादन व विकास करणे हा आहे.
हवामान व जमीन :
हवामान व जमीन :
हवामान -
महाराष्ट्र राज्य मोसमी वार्याच्या कक्षेत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात हवामानाची स्थिती सारखी नसते. कालावधीनुसार व विभागांनुसारही महाराष्ट्रात हवामानाची विविधता आढळते. कोकणात काहीसे उष्ण, सम व दमट तर सह्याद्री पर्वतावर आर्द्र व थंड हवामान असते. महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण, कोरडे व विषम हवामान आढळते.
अरबी समुद्रावररून येणारे मान्सुन वारे कोकणात व घाटमाथ्यावर जास्त पाऊस देतात. हे वारे सह्याद्री पर्वत ओलांडताना प्रतिरोध पर्जन्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडतो. मावळच्या पूर्व भागात मध्यम पाऊस पडतो. पर्जन्यछायेच्या प्रदेशाकडे (राज्याचा मध्य-पूर्व भाग) पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते. देशावर (पूर्वेकडील भाग) अवर्षणग्रस्त प्रदेशात अतिशय कमी पाऊस पडतो. विदर्भाच्या पूर्व भागात बंगालच्या उपसागरावरून वाहत येणार्या वार्यापासूनही काही प्रमाणात पाऊस पडतो. राज्याच्या अतिपूर्व भागात (गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे जिल्हे) काही भागांत अधिक पाऊस पडतो.
जमीन -
महाराष्ट्रात गोदावरी, भीमा, व कृष्णा तसेच तापी नदीच्या खोर्यात खोल थराची सुपीक, काळी माती पाहावयास मिळते. पठारावर इतरत्र मध्यम थराची काळी मृदा विस्तृतपणे पसरली आहे.
सह्याद्री पर्वत माथ्यावर, कोकणात रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांत, तर पठारावर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात जांभा प्रकारची लालसर मृदा आहे.
कोकणाच्या किनारपट्टीवर किनार्याची गाळाची मृदा सापडते. उत्तर कोकण, विदर्भाच्या पूर्व भागात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत तांबडी व पिवळसर मृदा आढळते.

Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud